सरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ही योजना खालील विभागांतील अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. १) उच्च शिक्षण विभाग उच्च शिक्षण विभागातील पारंपारिक अभ्यासक्रमांची १०० टक्के ट्युशन फी ही (शासकीय, अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांसाठी) सरकार देते. उच्च शिक्षण विभागातील जे अभ्यासक्रम व्यावसायिक आहेत त्या अभ्यासक्रमांसाठी ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रु. किंवा त्याहून कमी आहे त्यांच्या पाल्यांची शासकीय व अनुदानित महाविद्यालयांमधील १००% ट्यूशन फी सरकारकडून दिली जाते तर विना अनुदानित महाविद्यालयातील ५०% ट्यूशन फी सरकार कडून दिली जाते. ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रु. ते ८ लाख रु. असेल त्यांच्या पाल्यांची व्यावसायिक अभ्यासक्रमांची ५०% ट्यूशन फी (सर्व प्रकारच्या महाविद्यालयांसाठी) सरकारकडून दिली जाते. परीक्षा फी - व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के परीक्षा फी ही सरकारकडून दिली जाते तर पारंपरिक अभ्यासक्रमांची १०० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. २) तंत्रशिक्षण विभाग तंत्रशिक्षण विभागातील खालील अभ्यासक्रमांची ५० टक्के ट्युशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेश कॅप (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) मधून होणे आवश्यक आहे. पदविका - दहावीनंतरील इंजिनीअरिंग डिप्लोमा, १२वीनंतरील फार्मसी डिप्लोमा, १२ वीनंतरील हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा पदवी - इंजिनीअरिंग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, आर्किटेक्चर पदव्युत्तर पदवी - एम.बी.ए. / एम.एम.एस., एम.सी.ए. वरील सर्व अभ्यासक्रमांची ५० टक्के ट्युशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ३) वैद्यकीय शिक्षण विभाग पदवी - एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.एच.एम.एस., बी. यू.एम.एस., बॅचलर ऑफ फिजिओथेरपी, बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी व स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स व ऑर्थ्रोटिक्स, बी.एस्सी. (नर्सिंग) शासकीय अनुदानित, महानगरपालिका संचालित तसेच खासगी महाविद्यालयांमधील वरील अभ्यासक्रमांची ५० टक्के फी (शिक्षण शुल्क व विकास शुल्क) सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. ४) कृषी शिक्षण विभाग महाराष्ट्र कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर एज्युकेशन अॅण्ड रिसर्च द्वारे प्रवेश दिल्या जाणाऱ्या खालील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के ट्युशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच प्रवेश कॅप (केंद्रीय प्रवेश प्रक्रिया) मधून होणे आवश्यक आहे. पदविका - कृषी पदविका पदवी - बी.एस्सी. ऑनर्स (कृषी), बी.एस्सी. ऑनर्स (उद्यानविद्या), बी.एस्सी. ऑनर्स (वनविद्या), बी.एस्सी. ऑनर्स (सामाजिक विज्ञान), बी.एस्सी. ऑनर्स (पशुसंवर्धन), बी.एफ.एस्सी. (मत्स्य विज्ञान), बी.टेक. (जैवतंत्रज्ञान), बी.टेक. (अन्न तंत्रज्ञान), बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)