कलाक्षेत्रात तरुणांना मोठ्या संधी
चित्रकला, रंगकाम किंवा कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती यातून अनेक सर्जनशील व्यक्ती आपली सर्जनशीलता व्यक्त करतात. विविध कलाक्षेत्रांतील संधींवर नजर टाकली, की त्यांची व्याप्ती, आपली आवड आणि त्या क्षेत्रांतील आपल्याला असलेला वाव यातून आपल्याला अभ्यासक्रमाची निवड करता येते. चित्रकला, रंगकाम किंवा कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती यातून अनेक सर्जनशील व्यक्ती आपली सर्जनशीलता व्यक्त करतात. विविध कलाक्षेत्रांतील संधींवर नजर टाकली, की त्यांची व्याप्ती, आपली आवड आणि त्या क्षेत्रांतील आपल्याला असलेला वाव यातून आपल्याला अभ्यासक्रमाची निवड करता येते. शाळेत असताना ज्यांनी इंटरमिजिएट ड्रॉइंगची परीक्षा दिली आहे, त्यांना दहावीनंतर मूलभूत अभ्यासक्रमाला (फाउंडेशन) एक वर्षाचा प्रवेश मिळू शकतो. फाउंडेशन उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना थेट जी. डी. आर्ट्‌‌स या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. चित्रकला परीक्षेत ज्यांना 'अ' श्रेणी किंवा 'ब' श्रेणी मिळाली आहे, त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. यात फाइन आर्ट्‌‌स किंवा कमर्शिअल आर्ट अशी विभागणी होते. एकूण पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम राज्यातील सर्व प्रमुख शहरी भागांत उपलब्ध आहे.