'इंडिया'ची तरुणाई PUBG मध्ये बिझी, 'भारता'च्या तरुणांचा 'कलामसॅट' उपग्रह अवकाशी
रिफात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 3-D प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीने चक्क सगळ्यात कमी वजनाचा, म्हणजे फक्त 64 ग्रॅमचा उपग्रह बनवला आणि त्याला डॉ. कलामांचं नाव देऊन भारताची मान जगात उंचावली.` भारतात काल एक ऐतिहासिक घटना घडली. भारताने काल एकाचवेळी दोन उपग्रह 'लाँच' केले. रात्री ठीक 11:37 ला श्रीहरिकोटाच्या डॉ. सतीश धवन स्पेस सेंटर इथून इस्रोने एक PSLV C-44 (Polar Satellite Launch Vehicle) मधून दोन उपग्रह पाठवले. या उपग्रहांपैकी एक म्हणजे DRDO ने बनवलेला Microsat-R हा सैन्याच्या उपयोगाचा महत्त्वाचा उपग्रह आहे. पण विशेष आहे तो दुसरा. 'कलामसॅट' देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ दिवंगत डॉ. APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ या उपग्रहाला त्यांचं नाव दिलं गेलं आहे. पण खास गोष्ट अशी की, 'कलामसॅट' हा उपग्रह तामिळनाडूच्या पल्लापट्टी गावातल्या सहा 18 वर्षीय मुलांच्या टीमने बनवलेला आहे. या सहा जणांच्या टीमचा कॅप्टन आहे, रिफात शारुख. अमेरिकेच्या NASA आणि I Doodle Learning ह्या दोन संस्थांकडून Cubes in Space नावाची एक स्पर्धा भरवण्यात अली होती. त्यात रिफात शारुखच्या टीमने भाग घेतला होता. चेन्नईच्या Space Kidz India या संस्थेने रिफातच्या टीमला आर्थिक मदत केली आणि त्यानंतर या मुलांनी चमत्कार केला.